कवी श्री संजय छबुराव शेळके यांचा खेडेगावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला.अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत दारिद्र्याशी दोन हात करीत आणि मूलभूत सुविधांच्या अभावातून मार्ग शोधत त्यांनी आपले पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. एखाद्या उपाशी व्यक्तीने दगड धोंड्यांचा आधार घेत उंच डोंगरवार चढून डोंगर माथा गाठावा, त्याप्रमाणे त्यांनी आपली आयुष्य निखाऱ्याची खडतर वाट पादांक्रात करून शैक्षणिक शिखर गाठले. सध्या ते पुण्याच्या एका महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम करतात. समाजाकडे अतिशय सूक्ष्म आणि पारदर्शी दृष्टीने बघण्याची चाणाक्ष बुद्धी ही ईश्वरदत्त देणगी असावी असा त्यांच्या कविता वाचताना वाचकाला प्रत्यय येतो. आधीच प्रतिभा संपन्न बुद्धी आणि संवेदनशील मनाच्या कवी शेळके यांच्या ठिकाणी सुप्त असलेली काव्य प्रतिभा जीवनातील कडू गोड अनुभवाने जागृत झाली आणि त्यांच्या मुक्या लेखणीला वाचा फुटली. जीवनातील अनेक प्रसंग शब्दाचा आकार घेऊन काव्यरूपाने आविष्कृत होत गेले हे त्यांच्या कविता वाचून लक्षात येते. प्रतिभावान कवीचे हेच खरे लक्षण आहे.
Sale
Original price was: ₹270.00.₹216.00Current price is: ₹216.00. ₹
Reviews
There are no reviews yet.