शेगावचे श्री. गजानन महाराज व ललिता सहस्रनाम यांमधून मिळालेली प्रेरणा म्हणजेच ‘नवग्रह यंत्रे व बाराक्षार उपचार पद्धती’.
या पुस्तकाचा पहिला भाग आपल्या हाती देताना आज मला खूप आनंद होत आहे.
कुणाला वाटेल हे माझे आत्मचरित्र तर नव्हे? तसे वाटणे चुकीचे म्हणता येणार नाही.पण या विषयाशी काडीचा संबंध नसता माझ्या हातून असं काही संशोधित लेखन होणे यामुळेच आयुष्यातील काही अतर्क्य घटना व घडामोडी यांचा पुस्तकात डायरीच्या पानांच्या रूपाने उहापोह घ्यावा लागला. ज्या सत्य आहेत.
गेली 24 वर्ष हा पत्रिकेवरून बाराक्षार उपचार पद्धतीचा छंद मी जोपासला आहे. याचे आता अनेक निकषांच्या आधारे यशात रूपांतर होऊन नवी उपचार पद्धती म्हणून स्थानही मिळू शकणार आहे.
मानवी व्यक्तिरेखा शारीरिक दृष्टीने सारख्या दिसत असून प्रत्येकाची स्वभावभिन्नता वेगवेगळी कशी ? प्रत्येकाचे आजार वेगळे कसे ? असे प्रश्न निर्माण झाले की त्या व्यक्तीचा जन्म, त्या वेळचे वातावरण, इत्यादी अनेक घटकांकडे पाहावे लागते. अन ह्याला कारण त्या त्या वेळेचे प्रकृतीवरील अनेक ग्रहांचे प्रभुत्वही विचारात घ्यावे लागते .त्याशिवाय उत्तरे मिळत नाहीत.
बरेच मुद्दे पुस्तकात घेतले असल्याने त्यांची पुनरावृत्ती करण्याची इथं जरूर नाही. मी कसा घडलो व ते घडवण्यास कोणत्या घटना कारणीभूत झाल्या यांची सारी उत्तरे पुस्तकातून मिळतील अशी आशा आहे .पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाल्यावर या उपचार पद्धतीला परिपूर्णता मिळेल असे वाटते.त्यासाठी पहिल्या भागाचे अध्ययन आवश्यकच.
Reviews
There are no reviews yet.