बालपणा पासुन ते आज पर्यंतच्या जीवन प्रवासात, अनेकजण संपर्कात आले.
संपर्कातून निर्माण झालेल्या संगतीने त्यातील कांहीजण कायमचे मित्र बनले. अश्यांपैकीच एक म्हणजे आमचे मित्र श्रीमंत धामणकर उपाख्य म.श्री.. धा…
त्यांच्या आगामी प्रकाशीत होणा-रा कथासंग्रहाच्या निमीत्ताने, एक मित्र म्हणुन मी कांही तरी दोन शब्द प्रास्ताविक स्वरुपात लिहावेत अशी सुचना त्यांनी मला केली. म्हणुन तसा प्रयत्न करतोय.
सामान्यतः प्रास्ताविकात ,त्या पुस्तकातील विषयाचं रसग्रहण किंवा परीक्षण अभिप्रेत असतं. पण मी ते टाचण किंवा कच्चा आराखडा ना वाचला ना-पाहिला आहे.
त्यामुळे हे प्रास्ताविक त्या पुस्तका विषयी नसुन, लेखका विषयी आहे, त्यांच्या लेखन शैली विषयी आहे.
आजच्या या भोगवादी: चंगळवादी युगात, प्रत्येक विषयांत केवळ आपला स्वार्थ न स्वार्थ चं पाहण्याची विषवल्ली प्रचंड प्रमाणात फोफावली असताना, कांही जण आज ही आपल्या तत्वांशी, आई वडिलांनी केलेल्या संस्कारांशी, आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणा-रा अनेक व्यक्तिं विषयी, आपल्या जन्मभूमी बद्दल अतिशय कृतज्ञ असतात.
त्यापैकीच म.श्री..धा… हे एक व्यक्तिमत्त्व.
धामणकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जे कांही करतील ते समरसूनच करतील. त्यांच्या आई वडीलांच्या शिकवणीचा, संस्कारांचा त्यांच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव आहे. आपल्या बोलण्यात त्यांचा आदराने उल्लेख केल्याशिवाय त्यांच बोलणं कधीच पुर्ण झालेलं मी ऐकल नाही. आमचे आण्णा म्हणायचे असा एकदा तरी उल्लेख करणारचं, आईंचा उल्लेख झाल्यानंतर डोळ्यात टचकन पाणी आलेलं मी अनेकवेळा पाहिलयं. जे आई वडिलां विषयी तेच आपल्या दोन्ही कन्यांच्या बाबतीत. मुलींची नावं उच्चारतानाही लगेच भावुक होतील.
या काळात इतकी संवेदनशीलता फार कमी पाहायला मिळते.
परमेश्वर कृपेने सांसारिक सुखांचा स्वांत सुखाय उपभोग घेत असताना देखील त्यांनी आपली नाळ आपल्या आदर्शांशी, संस्कारांशी, तत्वांशी जोडुन ठेवली आहे, नव्हे तर अधिकाधिक बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उपरोक्त सर्व सद्गुण समुच्ययाचा पाझर, ओलावा त्यांच्या लिखाणात शब्दा शब्दांतुन प्रत्ययास येतो.
कुठलेही त्यांचे लिखाण, मग ते व्यक्तिचित्रण असो, स्थलदर्शन असो, वा प्रवास वर्णन वाचत असताना ते पात्र, ते स्थल, तो प्रदेश डोळ्यांसमोर उभा करण्याची क्षमता त्यांच्या लिखाणात आहे.
त्यांच लिखाण वाचत असताना, हे त्यांनी लिहलयं हे माहीत असुनही, अनेक प्रतिभावंत लेखकांचे चेहरे मनचक्षु समोर येतात.
अतिशयोक्त वाटेल पण कुठे पु लं चा भास होतो, कुठे व पु डोकावतायत असे वाटते तर कुठे साने गुरुंजी आठवतात.
आपणां सर्वां ईतकाच मी सुद्धा हे पुस्तक वाचण्यासाठी उत्सुक आहे. ‘चला तर मग, आपणं सर्वजण हा कथासंग्रह वाचनाचा आनंद घेयु यात’
धामणकरां बद्दल एका ओळीत सांगायच झालं तर, तुकोबांच्या एका अभंगातील एक ओळ आठवली,
मृदु सबाह्य नवनीत
तैसे सज्जनाचे चित्त
जसे लोणी अंतर्बाह्य मृदु असते, कोमल असते, सज्जन माणसे ही अशीच अंतर्बाह्य स्वच्छ असतात कोमल हृदयी असतात.
Reviews
There are no reviews yet.